रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवत मरणास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस 6 महिने सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवत मरणास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस 6 महिने सक्त मजुरी व दंडाची शिक्षा



पिंपळनेर,दि.12(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर):दि.23 नोव्हेंबर र.‌ 2013 रोजी 8 वाजेच्या सुमारास साक्री शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर हॉटेल उदय पॅलेसच्या पुढे लहान नाल्या जवळ आयसर क्रमांक एम.एच.18 एम 4489 वरील चालक कौतिक फकीरा गवळी राहणार भामेर तालुका साक्री याने त्याचा ताब्यातील आयसर ट्रक ही हायवेने सुरत कडेच चालून नेत असतांना भरधाव वेगात रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालून रोडवर नादुरुस्त उभा असलेला कंटेनर क्रमांक एन. एल 02 के 9517 हिचे इंडिकेटर चालू असतांना तिला मागून जोराची ठोस देऊन आयसर मधील इसम नामे गोरख झिपा वाघ यांचे मरणास व शिवराम जगन गवळे,किरण पाटील,विजय वाघ व कंटेनर चालक विकास पांडे राहणार कलकत्ता यांच्या दुखापती आणि वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला व तसेच गाडीचे कागदपत्र न बाळगता,विना इन्शुरन्स वाहन चालवले व अपघाताची खबर न देता पळुन गेला म्हणून त्याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात भादवि कलम 304 अ,279, 337, 338,427 व मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला.सदरील खटल्याचा चौकशी अंती आरोपी कौतिक फकीरा गवळी यास न्यायालयाने दोषी ठरविले व त्यास 6 महिने सक्त मजुरीची व रक्कम रुपये 19 हजार रुपयांचा दंड थोठावला.सदर प्रकरणात अंतिम युक्तिवाद सहा स.अ. चेतन वळवी यांनी केला व संपूर्ण खटल्यातील साक्षीदार यांची चौकशी विशेष सरकारी वकील अतुल डी जाधव यांनी केली.त्यांना संजय मुरक्या सहा संचालक व सरकारी अभियोक्ता धुळे यांचे मार्गदर्शन लाभले.सदर गुन्ह्याचा तपास करून दोषरोपत्र एपीआय एस एन भगत यांनी दाखल केले व पैरवी अधिकारी सादिक सय्यद यांनी कामकाज पाहिले.


छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new