मलांजन येथे पांझरा नदीवर पावणेदोन कोटी रुपये खर्चाच्या साठवण बंधा-याचे भुमिपुजन
;साक्री तालुक्यात 14 साठवण बंधा-यांना प्रशासकीय मान्यता
उर्वरीत बंधा-यांचे लवकरच भुमिपुजन.आमदार मंजुळाताई गावित पिंपळनेर,दि.12(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर):शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी पांझरा नदीवरील मलांजन या गावालगत पावणेदोन कोटी रुपये खर्चाच्या साठवण बंधा-याचे भुमिपुजन आमदार मंजुळाताई गावित यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना आ. मंजुळाताई गावितांनी सागीतले की,साक्री तालुक्यातील जास्तीत जास्त कृषी जमिन सिंचनाखाली आली पाहिजे या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरुवातीला 33 व नंतर 14 असे एकुण 47 साठवण बंधारे,सिमेंट गेटेड बंधारे मंजुर करुन घेतले आहेत.त्यात प्रामुख्याने काही मोठ्या नाल्यांवर,पांझरा-बुराई नदी, घोटी नदीवर दरेगाव, ढोलीपाडा,मलांजन, नवापाडा,शेवगे-कोकणगाव, बोडकीखडी,लगडवळ, पारगाव,रुणमळी, डांगशिरवाडे इ.ठिकाणी साठवण बंधा-यांची कामे हाती घेतलेली आहे.त्यात सप्टेंबर 2024 मध्ये मलांजन साठवण बंधा-याचे कार्यरंभ आदेश निघालेले असुन आज प्रत्यक्षात कामाचे भमिपुजन होत आहे. या बंधा-याची लांबी 130 मिटर असुन उंची 3.35 मिटर आहे.या बंधा-यात 3.48 दशलक्ष घनफुट पाणी साठणार आहे. साठलेल्या पाण्याचा 55 हेक्टर क्षेत्रास कृषी सिंचनाचा लाभ होणार आहे.या बंधा-यास 18 गेट आहेत. बंधा-याच्या बांधकामावर 1 कोटी 75 लक्ष रुपये खर्च होणार आहे.या बंधा-यामुळे कृषी सिंचनाबरोबरच या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.कृषी सिंचनाबरोबर या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.मलांजन,शेणपुर,येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार सौ. मंजुळाताई गावित यांचा साठवण बंधारा मंजुर करुन दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी जि.प.सदस्य गोकुळ परदेशी, साहेबराव गांगुर्डे,विनायक अकलाडे,पंकज मराठे,राहुल भोसले,बंडू नांद्रे,अजय सोनवणे,जितेंद्र बिरारीस, जितु नांद्रे योगेश अहिरराव, इंजि.सोनवणे साहेब,अभय शिंदे,हृषीकेश मराठे,ऋतूराज ठाकरे,अक्षय सोनवणे,पप्पु ठाकरे,पंकज भामरे आदी कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया :अंबादास बेनुस्कर