निजामपुर पोलिसांची कारवाई एकास अटक;कॉपर केबल चोरीचा गुन्हा उघड,साथीदारांचा शोध सुरु
पिंपळनेर,दि.25(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील सालटेक शिवारात असलेल्या गेल ऍण्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर.09 मधील कॉपर केबल चोरीचा गुन्हा निजामपूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.यासंदर्भात तालुक्यातील सालटेक गावाच्या शिवारात असलेल्या गेल ऍण्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर.09 मधील कॉपर केबल चोरट्यांनी लांबविल्याची घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 302,(2),3(5)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी तपास चक्र फिरवून संशयित आरोपी देविदास बंडु थोरात उर्फ देवऱ्या रा.रायपुर ता.साक्री यास पकडले. त्यांच्याकडुन 26 हजार रुपये किमतीची चोरलेली कॉपर केबल वायर जप्त करण्यात आली.त्यास रितसर अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,पोलीस उपअधीक्षक एस.आर. बांबळे,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे,मधुकर सोमासे, कर्मचारी यशवंत भामरे, प्रभाकर गवळे,रुपसिंग वळवी,प्रशांत ठाकुर,नारायण माळचे,रतन मोरे,नागेश्वर सोनवणे,प्रदीप आखाडे, खंडेराव पवार,परमेश्वर चव्हाण,श्रीराम पदमर,अशोक तावडे,सागर थाटसिंगारे,कृष्णा भिल, पृथ्वीराज शिंदे,गौतम अहिरे यांनी केली आहे.
छाया:अंबादास बेनुस्कर