सोयगाव तालुक्यातील पाच महिलांना ए पॉज मशीन चे वाटप गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वितरण*

*सोयगाव तालुक्यातील पाच महिलांना ए पॉज मशीन चे वाटप गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वितरण*


सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण 


सोयगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांचे काम सुरू आहे त्यामध्ये तालुक्यातील पाच महिलांना मंगळवारी गटविकास अधिकारी श्री दादाराव अहिरे यांच्या हस्ते इ पॉज मशीन चे वितरण करण्यात आले. 


सोयगाव पंचायत समिती उमेद अभियान मार्फत महिलांना बँकिंग व्यवसायात अग्रेसर होण्यासाठी तालुक्यातील बनोटी ,हनुमंत खेडा, गोंदेगाव ,फरदापुर आणि शिंदोड येथील प्रतिभा योगेश निकम, शुभांगी विनोद बोराडे ,ज्योती निलेश सोनवणे ,धनश्री दत्तात्रय निकम ,माधुरी प्रकाश महाजन ,या पाच महिलांनी छत्रपती संभाजी नगर येथे आरसीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले होते प्रशिक्षण झाल्यानंतर त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना प्रमाणपत्र प्राप्त होऊन बीसी सखी म्हणून तालुक्यामध्ये काम करण्यास पात्र झाले बँकिंग क्षेत्रात काम करण्याकरिता ई पॉज मशीन चे सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री दादाराव अहिरे यांच्या हस्ते पात्र महिलांना वाटप करण्यात आली. 

याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक श्री तुषार बरगट , तालुका व्यवस्थापक सत्य विजय राठोड ,तालुका व्यवस्थापक सखुबाई पवार, स्किल कॉर्डिनेटर अंजू सोने आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new