*प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांचे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन* रिपोर्टर रोहित जाधव पारोळा तालुका
आज दिनांक 26 जानेवारी 2025 वार रविवार रोजी दिव्यांगांच्या मागणी करिता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन ठीक सकाळी सात वाजता सुरू करण्यात आले या आंदोलनात दिव्यांगाच्या विविध मागण्यांचे निवेदन तयार करून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आले. नंतर पुढील निवेदन पोलीस मुख्यालयाचे एसपी *महेश्वर रेड्डी* साहेब यांच्याकडे सादर करून दिव्यांगाच्या रोष प्रगट करण्यात आला जिल्ह्याभरातून विविध दिव्यांग विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी सात वाजता हजर होते नंतर दिव्यांगाच्या समस्या व मागण्या सोडविण्याचे व मान्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व एस पी-महेश्वर रेड्डी यांच्याकडून देण्यात आले नंतर पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंडवर दिव्यांगांची सभा होऊन सगळ्या दिव्यांगांनी आपआपली समस्या मांडून आपले विचार प्रकट केले आणि संघटनेचे कार्य हे राज्यव्यापी करण्याचा संकल्प घेतला गेला अशा- प्रकारे *प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पारोळा* याचे एक दिवसाचे आंदोलन संपुष्टात आले.ह्या आंदोलनात -1)बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष 2)ललिताताई पाटील अध्यक्षा महिला आघाडी 3) शेख शकील दादा
4) धर्मराज पाटील 5) रोहित जाधव
6) दत्तात्रय वाणी 7) रुपेश पाटील
8) रुपेश सोनार 9) राजू भाऊ प्रहार सेवक
हे पदाधिकारी उपस्थित होते