पिंपळनेर शहरात हस्ती बँकेकडून रक्तदान शिबिर 76 जणांनी केले रक्तदान,तर 250 रुग्णांची नेत्र तपासणी
पिंपळनेर,दि.26(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)येथील हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान व नेत्र रोग तपासणी शिबिरात 76 जणांनी रक्तदान केले तर 250 रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली.पिंपळनेर येथे हस्ती को ऑपरेटिव्ह बँक शाखेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुरेखा कुंदनमल गोगड यांच्या हस्ते करण्यात आले.नेत्रदान शिबिराचे उद्घाटन सुरेखा लीलाचंद भावसार,लता शाम बोदाणी,सुवर्णा स्वरुप गोगड यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात हस्ती बँकेचे शाखा चेअरमन कुंदनमल गोगड,संचालक लीलाचंद भावसार,भालचंद्र ततार,अशोक राजमल कोचर,श्याम बोदानी, शामकांत कोठावदे,स्वरूप(केशरमल)गो गड,व्यवस्थापक हेमंत जोशी उपस्थित होते. पिंपळनेर शाखेला 30 वर्षे पूर्ण झाली असून सामाजिक बांधिलकी म्हणून या दोन्ही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.बँकेच्या मागील सभागृहात आयोजित शिबिराला रक्तदात्यांचा स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांना बँकतर्फे प्रमाणपत्र संचालकांच्या हस्ते देण्यात आले.नेत्र तपासणी शिबिरात 250 रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली.यात मोतीबिंदूचे 27 रुग्ण आढळून आले.त्यांची मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंदुरबार येथील कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालयात करण्यात येणार आहे.रक्तदान शिबिरासाठी धुळे येथील नवजीवन रक्तपेढीचे सहकार्य लाभले.यात डॉ.सुनील चौधरी व त्यांच्या टीमने शिबिर यशस्वी केले.नेत्र तपासणीसाठी नंदुरबार येथील कांता लक्ष्मी नेत्रपेढीचे डॉ.तुषार देवरे व टीमचे सहकार्य लाभले.रक्तदान शिबिर,नेत्ररोग तपासणी शिबिर यशस्वीतेसाठी संचालक मंडळ,बँक व्यवस्थापक हेमंत जोशी, संदीप बेंद्रे,संदीप पाटील, उज्वल कोठावदे,भूषण पगारे, कावेरी दुसाने,योगिता गवळी, साहेबराव नगराळे,चंद्रकांत सोनार,सचिन कोठावदे व चेतन कोतकर यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक हेमंत जोशी यांनी केले.अंबादास बेनुस्कर