साक्री तालुक्यातील 16 गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार;आमदार मंजुळा गावितांनी केले 33/11 के.व्ही. वासखेडी सबस्टेशनचे लोकार्पन

साक्री तालुक्यातील 16 गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार;आमदार मंजुळा गावितांनी केले 33/11 के.व्ही. वासखेडी सबस्टेशनचे लोकार्पन 


पिंपळनेर,दि.4(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील 16 गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार माळमाया परिसरातील वासखेडी येथील विज उपकेंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ.तुळशिराम गावित हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे,उप अभियंता साक्री गणेश जाधव उपस्थित होते.आमदार मंजुळा गावित यांनी सांगितले की,मागील आमदारकीच्या कालावधीत शेतक-यांचा निव्हाळयाचा प्रश्न असलेल्या विजेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन कृषी संजीवनी योजनेंतर्गत धाडणे,टिटाणे आणी वासखेडी येथे कृषी विषयक योजनेंतर्गत 33 केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्र मंजुर करुन घेतले त्यापैकी आज वासखेडी येथे 33/11 केव्ही क्षमतेचे विज उपकेंद्र पूर्ण झाले असून आज त्याचे लोकार्पण करीत आहे.या उपकेंद्रासाठी 2 कोटी खर्च आलेला असुन उपकेंद्राची क्षमता 5 एम.व्ही. इतकी आहे.या उपकेंद्रातुन 11 केव्ही क्षमतेची चिपलीपाडा परिसरात कृषीपंपासाठी विद्युत लाईन दिलेली असून त्यावरुन चिपलीपाडा,वरसुस,जामकी आणी वासखेडी परिसरातील 600 ते 650 शेतक-यांना विज पुरवठा केला जाईल.तर याच उपकेंद्रातून 11 केव्ही क्षमतेची दुसरी विद्युत लाईन असुन त्यावरुन डोमकानी, तलावपाडा,गोलदरपाडा, नारळपाडा,दिवल्यामाळ, मडगाव परिसरातील 800 शेतक-यांना विज पुरवठा केला जाईल.तिस-या वासखेडी गावठाण या विद्युत लाईनवरुन वासखेडी,वरसुस, डोमकानी,खुडाणे, चिपलीपाडा इ.गाव परिसरातील सुमारे 1200 घरगुती ग्राहकांना विजपुरवठा केला जाईल.थोडक्यात या वासखेडी सबस्टेशनमुळे 1400 कृषीपंपांना तर 1200 घरगुती ग्राहकांना विजपुरवठा केला जाईल आणी त्यामुळे जैताणे सबस्टेशनचा विजेचा लोड कमी होईल आणी जैताणे वासखेडी परिसरातील शेतक-यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.आज वासखेडी येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण झाले असुन या विज उपकेंद्रावरुन येत्या 2ते4 दिवसांत सर्वत्र विज पुरवठा सुरु होईल.याचबरोबर धाडणे आणी टिटाने या दोन्ही विज उपकेंद्रांचे काम प्रगतीत असुन महिना अखेरीस धाडणे येथील विज उपकेंद्राचे लोकार्पण केले जाईल.वासखेडी विज उपकेंद्रामुळे जैताणे विज उपकेंद्रावरील भार कमी होणार असुन माळमाथा परिसरातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणींवर मात करुन प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आम्हाला होत आहे असे डॉ. तुळशिराम गावित यांनी सांगितले.आमदार मंजुळा गावित यांनी शेतक-यांच्या विजेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन परिसरातील विजेचा प्रश्न मनापासून पूर्ण केला याबद्दल माळमाथा परिसरातील जनतेच्या वतीने महेश ठाकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता ठाकुर यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी प.स.सदस्य अशोक मुजगे यांनी केले सर्व मान्यवरांचा सत्कार कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन केला.या कार्यक्रम प्रसंगी निजामपुरचे ए.पी.आय मयूर भामरे,प.स.सतिष वाणी,ईश्वर ठाकरे,वासुदेव भदाणे,समता परिषदेचे राजेश बागुल,खोरी सरपंच मुकुंद बोरसे,वासदरे सरपंच नाना मगरे,कृ.उ.बा. शसंचालक वसंतदादा पवार, इंजि.सागर गावित,वारकरी संप्रदायाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत वासखेडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.विजेचा प्रश्न सोडविल्याबद्दल परिसरातील सरपंच व मान्यवरांनी आमदार मंजुळा गावित व डॉ.तुळशिराम गावित यांचे आभार मानून सत्कार केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी वासखेडी उपकेंद्रातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new