समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांना मूठमाती देण्यासाठी जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केले-डॉ.जितेश चौरे

समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांना मूठमाती देण्यासाठी जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्र सुरू केले-डॉ.जितेश चौरे


पिंपळनेर,दि.7(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)भारतीय लोकशाहीत पत्रकारिता हा चौथा स्तंभ,असतो पत्रकारांच्या निरोगी सुदृढ आरोग्यासाठी त्यांच्या प्राथमिक स्वरूपातील विविध आजारांवरील उपचार म्हणून मोफत रोगनिदान शिबिर घेवून पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांची,सहधर्मचारीणीचे सुद्धा आरोग्य निरोगी राहावे म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प आपण केला. आज च्या दिवशी 6 जानेवारी 1832 ला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पणकार दिनाच्या निमित्ताने आयुर्वेद तज्ञ डॉ.योगिता चौरे याही आयुर्वेद पंचकर्म ही सुविधा पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी 50 टक्के सूट देणार आहेत, ही सेवा बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण पत्रकार दिनानिमित्त सेवेची संधी आम्हा उभयतांना मिळणार म्हणून आम्ही ऊभयंता.भाग्यवान आहोत असे मौल्यवान प्रतिपादन डॉ. जितेश चौरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.तर प्रास्ताविक करताना प्राचार्य एस.डी.पाटील म्हणाले ब्रिटिशकालीन गुलामगिरीला झुगारून देण्यासाठी व स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्यासाठी,बाळ शास्त्री जांभेकरांनी विधवांचे, पुनर्विवाह,केशवपन व सती जाण्याची प्रथा यावर कडाडून टीका केली होती,आणि ब्रिटिश राजवटीत पत्रकारितेची मुहूर्तमेढ दर्पणकार,बाळशास्त्री जांभेकर यांनी रोवली होती. त्यांचा जन्म कोकणात 20 फेब्रुवारी 1812 मध्ये पोंभुर्ले या गावी झाला होता,तर 17 मे 1846 ला त्यांनी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.193 वर्षापासून हा पत्रकार दिन साजरा केला जातो आहे हे विशेष.दर्पणकार दिनाचे आयोजन पिंपळनेर तालुका पत्रकार संघ,साक्री तालुका व्हाईस ऑफ मिडिया ग्रामीण,सुहरी हॉस्पिटल पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त करण्यात आले होते.सुरुवातीला वृत्तपत्र सृष्टीचे जनक,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून,दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीला सर्व पत्रकार बंधू व त्यांच्या सह-धर्मचरणीचे,ऍसिडिटी, बीपी,कोलेस्ट्रॉल, डायबेटीस,ईसीजी, कार्डिओग्राफ,ब्लड,यूरिन चेक करणे त्यातून विविध प्रकारच्या टेस्टने रोगाचे निदान केले गेले,यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ.जितेश चौरे होते.प्रमुख उपस्थिती,इंजि.विजय चौरे, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप,चॅनलचे प्रतिनिधी अनिल बोराडे,प्रा.शिवप्रसाद शेवाळे,से.नि प्राचार्य एस.डी.पाटील,भिलाजी जिरे, अंबादास बेनुस्कर,चंद्रकांत घरटे,दिलीप बोळे,विशाल बेनुस्कर,भरत बागुल,आर.पी.मराठे,हरिष जगताप,रफिक शेख साकीर शेख,सद्दाम पटेल,अमोल पाटील,आदी मान्यवर व पत्रकार बंधू सहधर्मचारीणीसह उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघटनेतर्फे रुग्णांना केळी, फलाहारचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचाही सत्कार करण्यात आला.सुहरी हॉस्पिटलच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनीचाही पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन समुपदेशक प्रा.एस.डी.पाटील यांनी केले.शेवटी आभार पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले.

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new