सावळदबारा वन हद्दीमध्ये अवैध रितीने सागवान वृक्षांची तोड करणाऱ्यांवरती वन विभागाने केली कारवाई

सावळदबारा वन हद्दीमध्ये अवैध रितीने सागवान वृक्षांची तोड करणाऱ्यांवरती वन विभागाने केली कारवाई 



अवैध वृक्षतोड करणारे निवृत्ती अनासुने व दिपक गुंजे या दोघांवरती वन विभागाने केला गुन्हा दाखल 

सोयगाव /प्रतिनिधी सुनील चव्हाण 

अजिंठा वन परीक्षेत्र सावळदबारा वन परिमंडळ हद्दीमध्ये राखीव वन विभागाच्या हद्दीत भर दिवसा सर्रास पणे सागवान जातीच्या वृक्षांची कत्तल सुरु असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता सावळदबारा वन परिमंडळ चे वनपाल टी.झेड. खतीब. सावळदबारा बिट चे वनरक्षक सुनील खर्डे,टिटवी बिट चे वनरक्षक बबन राठोड यांनी सावळदबारा राखीव वन हद्दीमध्ये सापळा रचून सागवान झाडे तोडत असताना दोन युवकांना मुद्देमाला सहित ताब्यात घेतले व या सागवान वृक्षांची अवैध तोड करणाऱ्यांना ताब्यात घेऊन मुद्दे माल जप्त करून अजिंठा वन परीक्षेत्र  अधिकारी संतोष आर.दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा वन परीक्षेत्र कार्यालय येथे भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध सागवान वृक्षतोड करणारे   (१) निवृत्ती नारायण अनासुने राहणार सावळदबारा व (२) दिपक गजानन गुंजे राहणार सावळदबारा यांना अवैध रीतीने सागवान वृक्षांची कत्तल करताना सावळदबारा राखीव वन हद्दीमध्ये कुंडवाला खोऱ्या समोर जायमोक्यावरती घटनास्थळी पकडून त्यांच्या ताब्यातून सागवान वृक्षांची लाकडे जप्त करून निवृत्ती अनासूने, व दिपक गुंजे यांना ताब्यात घेऊन अजिंठा वन परीक्षेत्र कार्यालय येथे वन कायदा अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती अजिंठा वनपरीक्षेत्र कार्यालय येथून प्राप्त झाली आहे. यात अवैध रित्यांनी वृक्षतोड करणारे आणखीन कुणी सहभागी आहेत का या संदर्भामध्ये अजिंठा वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सावळदबारा वन परिमंडळ चे वनपाल टी.झेड. खतीब हे करीत आहे वनपाल खतीब यांच्या तर्फे सर्वांना असे आवाहन करण्यात आले आहे सावळदबारा वन परिमंडळ राखीव वन हद्दीमध्ये कुणी हीअवैध वृक्ष तोड करूनये असे कृत्ये करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे कृत्ये केल्यास भारतीय वन कायदा अधिनियम १९२७ च्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि योग्यती कारवाई केली जाईल असे  सांगण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new