साक्री आगारातील समस्या सोडवा;प्रहार संघटनेकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन

साक्री आगारातील समस्या सोडवा;प्रहार संघटनेकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन



पिंपळनेर,दि.19(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री आगारात दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते.त्यात दिव्यांगांना मुक्त संचार करता यावा,बसमध्ये चढ-उतार करताना बसच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे,तसेच दिव्यांगासाठी बसमधील बसण्याचे राखीव असलेली जागा दिव्यांगांसाठीच बसण्याची व्यवस्था करण्यात यावी,आदी मागण्या संदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आगार व्यवस्थापक सुनील महाले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की आगारात व्हीलचेअर व सुलभशौचालयामध्ये रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी, यामुळे जेणेकरून दिव्यांग प्रवाशांना तसेच इतर प्रवाशांना गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी,असे निवेदनात म्हटलेले आहे यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आलेले आहे.यावेळी प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष संजय पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे विभाग प्रमुख जयेश बावा,दीपक जाधव,शशिकांत अहिरराव, प्रदीप सोनवणे,युवराज मराठे,जगन कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. छाय:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new