राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ; तहसीलदार साहेबराव सोनवणे यांचे प्रतिपादन
पिंपळनेर,दि.31(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकास बहाल केलेला मतदानाचा हक्क हा सर्वश्रेष्ठ हक्क आहे.प्रत्येकाचे मतदान मूल्य समान आहे. यामुळे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात श्रेष्ठ व सर्वांत मोठी लोकशाही असल्याचे प्रतिपादन साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय धुळे,तहसील कार्यालय साक्री, अप्पर तहसील कार्यालय पिंपळनेर आणि कर्म.आ.मा. पाटील कला,वाणिज्य व के. अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिपळनेर येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पिंपळनेरचे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ,साक्री निवडणूक शाखेचे नायव तहसीलदार राजेंद्र सोनवणे, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र विनायक मराठे, कॉलेज कमिटी चेअरमन धनराज राजमल जैन,प्राचार्य डॉ.एल. बी.पवार,नोडल अधिकारी डॉ.के.एन.वसावे,आयक्यूएसी समन्वयक डॉ.संजय खोडके व्यासपीठावर उपस्थित होते.तहसीलदार साहेबराव सोनवणे म्हणाले की,निवडणूक ही आपणास एक दिवसाची घटना वाटते.परंतु,त्यासाठी अनेक महिने महसूल कर्मचारी,शिक्षक व इतर विभागाचे कर्मचारी सतत राचत असतात.मतदान प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने आपला मतपानाचा हक्क बजावला पाहिजे.तसेच नवीन मतवार नोंदणीसाठी युवकांनी जागृत असावे.मतदान जनजागृतीसाठी महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे साहेबराव सोनवणे यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदान जागृती पर करडलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करून निरीक्षण व परीक्षण तहसीलदार साहेबराव सोनवणे, अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ, धनराज शेठ जैन,प्राचार्य लहू पवार,नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांनी केले. याप्रसंगी निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी,उत्कृष्ट बी.एल.ओ.यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.एल.बी.पवार यांनी केले, त्यांनी महाविद्यालयात निवडणूक जनजागृतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचा माहिती दिली. याप्रसंगी उत्कृष्ट बीएलओ विवेक चौरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संजय खोडके यांनी केले. आभार प्रा.डॉ.के.एन.वसावे यांनी मानले.
छाया:अंबादास बेनुस्कर