सरपंचासह माजी सरपंचाला पाच लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले...
(धुळे प्रतिनीधी गोकुळ देवरे) तालुक्यातील नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच व - माजी सरपंचाला तब्बल पाच लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले.या घटनेमुळे लाचलुचपत विभागाच्या धडकेबाज कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जाते आहे.धुळे तालुक्यातील नंदाणे गावातील शेतजमीनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे पत्र जमा केले होते.तक्रारदाराने
नंदाणे ग्रामपंचायत कार्यालय येथे जावून सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवून पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र पाटील यांनी ग्राम पंचायतीत ठराव करून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता पाच लाख रूपये लाचेची मागणी केली.सरपंच रवींद्र पाटील यांनी व त्यांच्या सोबत असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदारकडे तडजोडीअंती अडीच लाख रूपयांची मागणी करून त्यापैकी एक लाख रूपयांचा पहिला हप्ता घेण्याचे मान्य केले. त्यानुसार सरपंच रवींद्र पाटील यांनी एक लाख रूपयांची लाच स्विकारून माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकडे दिली. शिरसाठ यांनी रक्कम खिशात ठेवून घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक शर्मिठा घारगे वालावलकर व धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रूपाली खांडवी,पंकज शिंदे,तसेच राजन कदम, मुकेश अहिरे,संतोष पावरा, प्रविण मोरे,प्रशांत बागुल, मकरंद पाटील,रामदास बारेला,प्रविण पाटील सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी केली.