अहिल्याबाई होळकर वाचनालय उडाणे येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

अहिल्याबाई होळकर वाचनालय उडाणे

येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी



पिंपळनेर,दि.3(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)तालुक्यातील उडाणे येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उडाणे गावातील ज्येष्ठ नागरिक  कृष्णाजी बागुल हे होते. प्रतिमा पूजन अभिमन्यू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास हाके व उपशिक्षक एस.के.बागूल यांनी माहिती दिली.वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन सुरू असल्याने या प्रदर्शनाला त्रिमुर्ती विद्याप्रसारक संस्थेच्या उडाणे माध्यामिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली.ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आलेले विविध ग्रंथ विद्यार्थ्यांनी पाहिले.विद्यालयाचे उपशिक्षक एस.के.बागुल यांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेले विविध ग्रंथ,साप्ताहिके,नियकालिके व बालसाहित्य इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच अहिल्याबाई होळकर वाचनालयाचे अध्यक्ष रोहिदास हाके यांनी विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्र वाचनाची सवय लावून प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन रोहिदास हाके यांनी केले. यावेळी रत्नाकर हाके, जिभाऊ मासुळे,सुनिल हाके आदी वाचक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new