सोयगाव : सोयगाव तहसील कार्यालयातून अवैद्य गौण खनिज वाहतुकीचा विनानंबर ट्रॅक्टर मध्यरात्री गायब ; अज्ञाताविरुद्ध पोलिसात तक्रार
सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण
विना नंबरचा ट्रॅक्टर फर्दापूर - शेंदुर्णी बायपास रस्त्यावर अवैध गौण खनिजाचा (मुरूम) वाहतूक करतांना महसूल पथकाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दी १) दुपारी जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला होता.तसेच चौकशी अंती एक लाख सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.दरम्यान जप्त केलेला विना नंबरचा ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारातून गुरूवारी (दी.१६) रोजी मध्यरात्री गायब झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी तहसीलदार सोयगाव यांनी सोयगाव पोलिसांना पत्र दिले आहे.
प्रशासनाच्या ताब्यातून हा ट्रॅक्टर कोणी चोरी केला असावा या बाबत तालुक्यात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
शासनाची रॉयल्टी चुकवून विना परवाना विना नंबर असलेला ट्रॅक्टर चेसिस नंबर आधारे सोयगाव येथील हर्षल कैलास काळे यांच्या मालकीचा असल्याचे समजले होते.त्यावरून ट्रॅक्टर मालकास शासनाच्या नियमाने एक लाख सहा हजार रुपये दंड देण्यासाठी नोटीस काढण्यात आलेली होती.तसेच जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. पंधरा दिवसानंतर जप्त केलेला ट्रॅक्टर गुरूवारी (दी.१६) मध्यरात्री तहसील कार्यालयातून अचानक गायब झाला आहे.