साक्री पिंपळनेर आगारासाठी 60 नविन एस.टी.बसेस उपलब्ध करुन द्याव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे केली आ.मंजुळा गावितांनी मागणी

साक्री पिंपळनेर आगारासाठी 60 नविन एस.टी.बसेस उपलब्ध करुन द्याव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे केली आ.मंजुळा गावितांनी मागणी 




पिंपळनेर,दि.23(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)राज्य परिवहन विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1000 ते 1200 नविन बसेस राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत लवकरच येणार अशी घोषणा केली आणी त्याअनुषंगाने धुळे राज्य परिवहन विभागासाठी 250 नविन बसेस उपलब्ध करुन द्याव्या व त्यातुन 60 बसेस साक्री पिंपळनेर या आगारास उपलब्ध करु द्याव्यात असे पत्र आ.मंजुळा गावित यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना समक्ष भेटुन दिले पत्रात त्यांनी म्हटले आहे की,मागील आमदारकीच्या कालातधीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एस.टी. महामंडळाच्या अमृत महोत्सव समारंभात घेतलेल्या निर्णय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फ 193 बस स्थानकांचे सुशोभिकरण करण्याचा संकल्पात धुळे जिल्ह्यातील धुळे,साक्री, पिंपळनेर,आणी चिमठाणा दोंडाईचा या बस स्थानकांचे सुशोभिकरण मंजुर करुन घेतले आणी त्यानुसार साक्री व पिंपळनेर येथील बस स्थानकाचे काँक्रीटिकरणाचे काम सुरु देखील झालेले आहे.साक्री पिंपळनेर आगाराकडे असलेल्या एस.टी.बसेस या कालबाह झालेल्या आहेत.या सर्व बसेसचे आयुष्यमान जवळपास संपलेले आहे. सध्या असलेल्या बसेसची अवस्था जेमतेम आहे ब-याचश्या 12 लाख किलोमीटरप्रक्षा जास्त फिरलेल्या आहेत त्यांचे आरटीओ पासिंग होत नाही. बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पाठवु शकत नाही.धुळे जिल्हा ग्रामिण व आदिवासी असुन एस.टी. महामंडळास जास्त उत्पंन्न देणारा जिल्हा आहे.प्रवासी तसेच महिला वर्ग एस.टी. महामंडळाच्या बसव्दारे प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात.शिक्षणासाठी जा ये करणारे विद्यार्थी एस.टी बसनेच प्रवास करत असतात.तेव्हा या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे जिल्ह्यास 250 नविन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात आणी त्यातुन साक्री-पिंपळनेर आगारास उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागण राज्याचे नुतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे मागणी आ.मंजुळा गावित आणी जिल्हा शिवसेना प्रमुख तुळशिराम गावित यांनी लेखी पत्राव्दारे समक्ष भेटुन केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new