साक्री पोलिसांची सलग दुसरी मोठी कारवाई;शेतात लपविलेला 39 लाखाचा बनावट दारूसाठा जप्त
पिंपळनेर,दि.11(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री पोलिस ठाण्याचे एपीआय जयेश खलाणे यांनी सलग दुसरी मोठी कारवाई केली आहे.पाच दिवसांपुर्वीच म्हसदी गाव शिवारातून 67 लाखांचा बनावट दारूचा साठा जात केला होता.दरम्यान त्यातील आरोपी जयेश गुंजाळ याने त्याच्या शेवग्याच्या शेतात देखील माल लपवून ठेवलेल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तेथे काल छापा टाकला.या कारवाई शेतातून बनावट दारुचा 39 लाखांचा साठा जप्त करण्यात आला.म्हसदी(ता.साक्री) गावशिवारातील वसंत शामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश गुंजाळ (रा.म्हसदी)हा खेडत असलेल्या शेवगा पिकामध्ये त्याने अवैध दारूसाठा लपविल्याची खात्रीशीर माहिती साक्री पोलिस ठाण्याचे एपीआय जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या सुचनेनुसार एपीआय अनिल बागुल, पीएसआय प्रसाद रौंदळ, साळुंखे व पथकाने तेथे छापा टाकला असता दारूसाठा मिळुन आला.34 लाख 56 हजार रूपयांचा रॉयल ब्यु माल्ट व्हिस्कीच्या 180 एमएलच्या बाटल्याचे एकुण 360 खोके (प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या),4 लाख 70 हजार 400 रुपये किंमतीची देशी दारु सुगंधी संत्रा 180 मिलीचं एकुण 140 खोके (प्रत्येक खोक्यात 48 सिलबंद बाटल्या) व 600 रूपयांची पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकुण 39 लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जयेश वसंत गुंजाळ याने मानवी जिवितास हानीकारक व विना बेंच आणि मॅन्युफॅक्चर नंबर आणि विक्री किंमत नसलेला वरील बनावट दारूसाठा विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने पिवळया रंगाच्या ताडपत्री खाली लपवून ठेवलेला होता.म्हणुन जयेश गुंजाळ याच्याविरुध्द पोहेकॉ शांतीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.तसेच त्याच्याविरुद्ध दि.4 रोजी एक गुन्हा दाखल आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे,एलसीबीचे पीआय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जयेश खलाणे,अनिल बागुल, विकास शेवाळे,पीएसआय प्रसाद रौंदळ,राजेंद्र साळुंखे, राजु जाधव,संजय गोकुळ शिरसाठ,शांतीलाल पाटील, तुषार जाधव,पोना आनंद चव्हाण,साईनाथ पवार, धनंजय चौधरी यांच्या पथकाने केली.
छाया:अंबादास बेनुस्कर