कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड;निजामपुर पोलीसांची धडक कारवाई,3लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

कॉपर केबल चोरी करणारी टोळी गजाआड;निजामपुर पोलीसांची धडक कारवाई,3लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त 



पिंपळनेर,दि.31(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)टिटाणे ता.साक्री शिवारात असलेल्या सुजलॉन कंपनीचे टॉवर मधून अज्ञात चोरट्यांनी 84 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल चोरी केली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे.निजामपूर पोलिसांनी गुप्त माहीतीवरुन 5 जणांची टोळी जेरबंद केली आहे.या टोळीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मारुती कार,एक मोटारसायकल व चोरी केलेली कॉपर केबल असा एकुण 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.यासंदर्भात,टिटाणे ता.साक्री येथील सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक व्ही-18 मध्ये पहाटे 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी 84 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल चोरुन नेली होती.याप्रकरणी निजामपुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास निजामपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी करुन गुप्त माहीतीवरुन जयेश बागुल, मनोहर बागुल दोघे रा.सिंदबन ता.साक्री,शेख साबीर शेख शब्बीर पिंजारी,रा.शास्त्रीनगर नंदुरबार,जितेंद्र ऊर्फ जितु पवार,ललीत चौरे दोघे रा.वाल्हवे ता.साक्री या 5 जणांना ताब्यात घेवुन त्यांची कसुनचौकशी केली.तेंव्हा या टोळीने सुजलॉन कंपनीचे टॉवर मधून कॉपर केबल चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली मारुती कार,एक मोटारसायकल व चोरी केलेली कॉपर केबल असा एकुण 3 लाख 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,साक्री उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.आर. बांबळे,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सोनवणे,मधुकर सोमासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रुपसिंग वळवी,हवालदार प्रशांत ठाकुर,नारायण माळचे,रतन मोरे,नागेश्वर सोनवणे,प्रदिप आखाडे, सागर थाटसिंगारे,कृष्णा भिल,पृथ्वीराज शिंदे,पोलीस कर्मचारी परमेश्वर चव्हाण, गौतम अहिरे,सुनिल अहिरे यांनी केली आहे.

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new