पिंपळनेर येथील व्याख्याते प्रशांत कोतकर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

पिंपळनेर येथील व्याख्याते प्रशांत कोतकर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित



पिंपळनेर,दि.20(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)बदलापूर मधून 31 वर्षापासून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र उल्हास प्रभात चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे,बदलापूर-अंबरनाथ बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव,संपादक राहुल गडपाले,उल्हास प्रभातचे संपादक डॉ.गुरुनाथ बनोटे यांच्यासह कैलास मनोरे,रवी कुंभार,गजानन टोहके, देवेसिंग राजपूत,डॉ.चित्रलेखा माने उपस्थित होते.

या भव्य कार्यक्रमात पिंपळनेर येथील व्याख्याते प्रशांत कोतकर यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,मानपत्र,स्मृतिचिन्ह,भेटवस्तू व मानधन असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अध्यक्षीय भाषणात आमदार किसन कथोरे यांनी प्रशांत कोतकर यांच्या कार्याचे कौतुक करत अशी व्यक्तिमत्व  समाजाचा आदर्श असतात त्यांच्या शब्दांनी समाजाला योग्य दिशा मिळते समाज प्रबोधनाच्या मार्गाने जातो अशी माणसे म्हणजे समाजाला संजीवनी देण्याचे कार्य करतात त्यांचा गौरव होणे म्हणजे समाजाचा गौरव होणे आहे.संपादक राहूल गडपाले म्हणाले की,पुरस्कार हे संस्कारांचे प्रतिबिंब आहे त्यातून समजाला प्रेरणा मिळत असते आधीक काम करण्याची ऊर्जा मिळत असते.

राज्यभरातून आलेल्या दिवाळी अंकांमधून 13 दिवाळी अंक निवडण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक अवतरण सकाळ मुंबई, द्वितीय क्रमांक उद्याचा मराठवाडा नांदेड,तृतीय क्रमांक अपेक्षा कोथरूड पुणे, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना आरती नेरपगार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new