दुसाणे प्राथमिक रुग्णालय बनले 'रेफर सेंटर'; रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा आरोग्य सेवेची हेळसांड

दुसाणे प्राथमिक रुग्णालय बनले 'रेफर सेंटर'; रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा आरोग्य सेवेची हेळसांड


पिंपळनेर,दि.5(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांची उणीव भासत असून,याचा परिणाम थेट आरोग्य सेवेवर होताना दिसत आहे.आरोग्य केंद्रात दाखल होणाऱ्या गरोदर माता आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांना साकी किंवा धुळे येथे पाठविण्यात येत असल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या 'रेफर सेंटर' झाल्याचा अनुभव रुग्णांना येत आहे.दुसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा मनुष्यबळावा अभाव आहे. मागील गेल्या तीन वर्षापासून आरोग्य कें द्रातील रिक्तपदे भरली गेली नाहीत.यामुळे अत्यंत तोडक्या मनुष्यबळावर आरोग्य सेवेचा भार आला आहे.वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी पुरेशा संख्येने नसल्याने रुग्णांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांचे देखील हाल होत आहेत. दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.यापैकी वैद्यकीय अधिकारी डॉ.लीना जाधव यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्या कामावर येत नाहीत.परिणामी एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहेत.त्यातही कामावर असलेले वैद्यकीय अधिकारी हे प्रशिक्षणार्थी असल्याने आरोग्य केंद्राचे प्रशासकीय कामकाज सांभाळताना आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे.दुसाणे प्राथमिक केंद्राला परिसरात 31 गावे जोडली गेली आहेत.यात दरोरोज 50 ते 80 रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी केली जाते.तसेच या आरोग्य केंद्राला 6 उपकेंद्र जोडलेली आहेत त्याचा भार देखील प्राथमिक आरोग्य कें द्रातील कर्मचाऱ्यांवरच आहे.रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा,आरोग्य सेवेची हेळसांड*

आरोग्य केंद्रातील सात जागा रिक्त असून त्यात एक आरोग्य सेविका,एक नर्स,एक स्वीपर,तीन शिपाई,एक आरोग्य सहाय्यिका ही पदे रिक्त आहेत.अपूर्ण मनुष्यबळामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिला व इतर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी आहेत. यामुळे रुग्णांना साक्री ग्रामीण रुग्णालय किंवा धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते.यामुळे आरोग्य केंद्र सध्या रेफर सेंटर बनल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.या समस्येसंदर्भात ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेवून कैफियत मांडली असून त्यावर अद्याप समाधानकारक तोडगा मात्र निघालेला नाही,आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने रिक्तपदे तात्काळ भरली जावीत,अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.प्राथमिक आरोग्य कें द्रातील रुग्णवाहिका सुस्थितीत असून औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. इतरही अनेक सेवा आरोग्य कें द्रातून पुरविल्या जात असून, त्या राबविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.चांगली आरोग्य सेवा मिळावी*दुसाणे गावातील लोकसंख्या आणि आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्राचा विचार केल्यास आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.यामुळे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरीत भरणे गरजेचे आहे,असे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकरे म्हणाले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी इतर कर्मचाऱ्यांचा ताण पडतो.प्रशासनाने याकडे लक्ष देवूचन चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत,अशी मागणी ज्योतिबा समुद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new