पिंपळनेर,दि.16(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)लाटीपाडा धरणातून काटवन परिसरासाठी तसेच,पांझरा नदीतून काठावरील गावांना पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्यात यावे,या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली काटवन परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की,साक्री तालुक्यातील काटवान परिसर कायमस्वरुपी दुष्काळ असलेला भाग आहे. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच पशुधनाची तहान भागविण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो.परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी कडक उन्हामुळे मार्च महिन्यातच तळ गाठला आहे.लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यावर येणारे दिघावे,गणेशपूर,प्रतापपूर, छाईल,नाडसे,दारखेल, निळगव्हाण,बेहेड व विटाई या सर्व गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.एवढेच नव्हे तर कासारे गाव पांझरा नदी काठावर वसलेले आहे.मात्र,गावात टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पांझरा नदीकाठावर आहेत.त्यामुळे कासारे ग्रामपंचायत कार्यालयाने देखील नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.या वेळी विटाईचे सरपंच अशोक साळवे,उपसरपंच दीपक खैरनार,बेहेडचे सरपंच अजय तोरवणे,दारखेलचे सरपंच प्रभाकर भामरे, नाडसेचे सरपंच विजय भामरे, प्रवीण तोरवणे,कल्पेश भामरे, विशाल भामरे,प्रभाकर तोरवणे,अशोक तोरवणे, गजमल कुवर,विजय जोशी, मिथुन भामरे,हरिश्चंद्र खैरनार, विनायक भामरे,बालू माळीच, रोहित खैरनार,रोहन खैरनार, निलेश कुवर,साहेबराव कुवर, दीपक मोरे,केतन मोरेअरूण मोरे,मुकेश पाटील आदींसह काटवान परिसरातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*पाण्यासाठीची पायपीट थांबवा*काटवान परिसरातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमार्फत पिण्याच्या पाणीसाठी मागणीपत्र दिले आहे.तीव्र उष्णता असल्यामुळे जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही.ग्रामस्थ,महिला,माता भगिनींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते.सद्यस्थितीत लाटीपाडा धरणात पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.त्यामुळे पांझरा नदीपात्रात व लाटीपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून त्वरीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.
छाया:अंबादास बेनुस्कर