बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार;वसमार येथील शेतकऱ्यांमध्ये भीती:वन अधिकाऱ्यांनी केली पाहणी

बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार;वसमार येथील शेतकऱ्यांमध्ये भीती:वन अधिकाऱ्यांनी केली पाहणी



पिंपळनेर,दि.11(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील वसमार येथे बिबट्याने हल्ला करून तीन वर्षाच्या वासरुवर फडशा पाडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.साक्री तालुक्यातील वसमार येथील शेतकरी निंबा राजाराम आजगे,यांची हिंदळ्या शिवारात शेती आहे. निंबा आजगे,हे नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात जनावरांना बांधून घरी गेले.ते सकाळी गोठ्यात दूध काढण्यासाठी आले असता,त्यांना वासरुवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात आले.आजगे यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली.पिंपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसदी वनपाल दीपाली अहिरे,वन कर्मचारी नितीन भदाणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.साक्री तालुक्यातील म्हसदी,वसमार तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन*परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री एकटे फिरणे टाळावे, प्रथमदर्शनी हे बिबट्याच्याच पायाचे ठसे आहेत.आपापले पशुधन सुरक्षित राहावे,म्हणून गोठे अधिक मजबूत करावेत. याशिवाय प्रत्येक शेतकऱ्यांनी बांधावर शेणाच्या गोक्या जाळून त्यावर मिरचीची भुकटी टाकावी.जेणेकरून त्या वासाने बिबट्या शेत वस्तीकडे येणार नाही.असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गीते यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new