गुजरात राज्यात होणारी मद्य तस्करी रोखली
पिंपळनेर पोलिसांची कारवाई, 2 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपळनेर,दि.6(अंबादास बेनुस्कर)गुजरात राज्यात अवैधरित्या होणारी मद्य तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे.पोलिसांनी गुजरात सीमेवरील ओटाबारी तपासणी नाक्यावर 59 हजार 300 रुपये किंमतीचा दारुसाठा,2 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 2 लाख 59 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे बांना मिळाली होती.त्याआधारे पोलिसांनी गुजरात सीमेवरील ओटावारी तपासणी दिशेने येणारे ओमनी वाहन (एमएच 43 आर-671) थांबवून तपासणी केली असता त्यात दारुसाठा मिळून आला.यात मॅकडॉल नंबर वन,गोवा टु ईन वन कंपनीची विदेशी दार,कॅस्टल व्होडका दारु, कांगारू बियर असा एकूण 59 हजार 300 रुपये किमतीचा साठा२शस्ताव 2 लाख रपये किमतीचे वाहन असा एकूण 2 लाख 59 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित राहुल सुभाष पवार रा.इंदिरानगर पिंपळनेर ता.साक्री,यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनांप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,पोलीस उपअधीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे,पोलीस उपनिरिक्षक भूषण शेवाळे पोकों नरेंद्र माळी,चेतन गोसावी,सोमनाथ पाटील पंकज वाघ,पोना दत्तु कोळी, दीपक पवार यांनी केली आहे.
छाया:अंबादास बेनुस्कर