आनंद आजचा.सन्मान कामगार लाभार्थ्यांचा
शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव घाट,शेखपूर, सिरसाळा, सिरसाळा तांडा, या गावांमध्ये आज बांधकाम कामगारांना कामगार पेटी, गृहउपयोगी भांड्यांचा संच व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शिधापत्रीका धारकांना आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते. विकासकामे केल्याने प्रत्येक गावात नागरिकांनी जल्लोषात स्वागत करीत माझा यथोचित सत्कार केला. विकासकामे करतांना मी कधीही जातपात, धर्म, पंथ, पक्ष बघितला नाही. सिल्लोड सोयगाव मतदार संघातील प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर वीज, पाणी, पक्के रस्ते ड्रेनेज लाईन अशी कामे केली आहेत. काही कामांना मंजुरी मिळालेली असून लवकरच ती पूर्ण होतील. आपला आशिर्वाद आणि साथ माझ्या पाठीशी अशीच कायम राहू द्या, विकासकामे आणि सर्वसामान्यांच्या सेवेत कायम तत्पर राहील अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली.शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून कोणतीही बहीण वंचित राहणार नाही अशी हमी दिली. भराडी येथे सुरु असलेल्या नॅशनल सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून दोन हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळवण्यासाठी कुठल्याही रेशन दुकानदारांना शुल्क द्यावे लागू नये यासाठी पालकमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब मित्रमंडळाकडून शंभर (१००/-) रुपये शुल्क भरण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.