संत एकनाथ विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

poads

संत एकनाथ विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन 


सिल्लोड :   सिल्लोड येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित  संत एकनाथ  विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त  अभिवादन करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  संत एकनाथ प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. दिनेश गोंगे यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणुन  संत एकनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती . हेमलता बोरोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश गोंगे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थी आशिष साबळे,वेदांत राऊत, वैष्णवी चिंचपुरे, सावली पदमिरे,जयदीप खोसे, राम अहिरे, सार्थक पदमिरे, आदींनी भाषणाद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी लाल बहादूर शास्त्री जयंतीचे महत्व पटवून दिले.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सहशिक्षक श्री.गणेश साळवे,आदेश सुरडकर,रमेश सपकाळ,गणेश गरुड,सचिन गव्हाणे,सचिन पालोदकर,रितेश दळवी,साळूबा सुलताने, सागर वायकुळे, विनोद तांगडे, सुवर्णा फालक, मंजुषा देशपांडे,सीमा कासार, अश्विनी तायडे,सुनंदा ठाकूर, गीता जाधव,शारदा ठोंबरे,जितेंद्र साबळे,सतिष देशमुख,आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सहभाग होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा सरोदे व कु.आदिती काकडे  यांनी केले तर आभार सहशिक्षक गणेश साळवे यांनी मानले.

new

Post a Comment

أحدث أقدم