फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे अविष्कार स्पर्धेत सुयश

पिंपळनेर येथील फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे अविष्कार स्पर्धेत सुयश


पिंपळनेर,दि.13(अंबादास बेनुस्कर)येथील शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित रुपेश बधान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे आयोजित अविष्कार 2025 स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.अंतिम वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चार प्रोजेक्ट सादर केले होते.त्यात प्रथम महिमा साबळे व ग्रुप यांनी अँटीसेप्टिक स्प्रे तसेच रोहित गोयेकर व ग्रुप यांनी पलाश इंडिकेटर,सायली एखंडे व ग्रुप यांनी हरबल बॉडी वॉश,अनिकेत बच्छाव व ग्रुप यांनी युमिन बुस्टर लॉलीपॉप हे प्रोजेक्ट या स्पर्धेत सादरीकरण केले होते. त्यात महिमा साबळे व ग्रुप यांनी सादर केलेल्या अँटीसेप्टीप स्प्रे यास कास्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान,सचिव रुपेश बधान,प्रा.गणेश अहिरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new