आमदर पाझर तलाव फुटल्याने निजामपूर-जैताणे गावासह परिसरातील शेती जलमय,परतीच्या पावसाने धुमाकूळ
पिंपळनेर,दि.16(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे,खुडाणे, डोमकानीसह परिसराला गेल्या चार दिवसांपासून मेघगर्जनेसह झोडपले रोहिणी नदीस पूर आलेला होता. त्यातच डोमकानीजवळ ढगफुटीसदृश मुसळधार पावसात रात्री दहाच्या सुमारास आमदर काळीभुई हा जुना पाझर तलाव फुटला. पुराने महापुराचे रुद्ररूप घेतले.यामुळे शेतीत खूप पिकांचे नुकसान झाले आहे.रात्री पुराचे पाणी गावात शिरले* रात्री अकरा वाजेच्या सुमारास निजामपूर,जैताणे गावांत पुराचे पाणी घुसले.जैताणे येथे ग्रामदैवत भवानीदेवी मंदिर परिसरातील नागरवाडीपर्यंत पाणी घुसले.सरपंच प्रतिनिधी गजानन शाह यांनी वीज वितरण कंपनीचे सहा अभियंता ठाकूर यांच्याशी संपर्क साधला.दुर्घटना होऊ नये यासाठी रोहिणी नदीकिनाऱ्यावर असलेल्या दोन डीपी त्यांनी बंद केल्या. रात्रभर आणि सोमवारी दुपारपर्यंत वीज बंद पडली होती.निजामपूरचे सपोनी मयूर भामरे यांनी रात्री तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली.गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.अचानक आलेल्या वादळी वारे व मुसळधार पावसात मका,कापूस,बाजरी, सोयाबीन,कांदे,आदी पिके जमीनदोस्त झाली.शेतात तलाव साचलेत.वादळी वारे व मुसळधार पावसात मका, कापूस,बाजरी,सोयाबीन, कांदे,आदी पिके जमीनदोस्त झाली.शेतात तलाव साचले आहेत.तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी तातडीने दखल घेतली.तलाठी जितेंद्र बागुल हे घटनास्थळी हजर झाले होते.यावेळी भास्कर पवार,सुरेश सोमनाथ,दिलीप गवळे,गोकुळ शिंदे आणि डोमकानी उपसरपंच ललित पवार उपस्थित होते.