चितेगाव येथील दोन त
रुणांची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या .
बिडकीन प्रतिनिधी/अकील /शेख/
बिडकीन पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चितेगाव येथील एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात तर दुसऱ्या ३३ वर्षीय तरुणाने चितेगाव परिसरात गट न.२०६ मधील शेतात लिंबाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली.एकाच दिवशी दोन तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने चीतेगाव व आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.सदरील दोन्ही घटनेतिल तरुणांनी आत्महत्या केली आहे की अजून काही याचा बिडकीन पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार बिडकीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चितेगाव येथे वास्तव्यास असलेल्या आकाश सतीश कुलकर्णी वय ३० वर्ष याने आपल्या राहत्या घरात मध्यरात्री ३ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ आपले सहकारी सूकटकर,सुरज ढवळे,माळी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून आत्महत्या केलेल्या तरुणास बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी हलवण्यात आले. पोलिसाना आकाश याने आत्महत्या का केली याचा शोध घेण्या कामी बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुगे व माळी हे करीत आहेत.
तसेच दुसरी घटना चितेगाव शिवारातील गट क्रमांक २०६ मधील एका शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन रमेश बबन अंगरख वय ३३ रा. चितेगाव या तरुणाने दि. ४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी साधारण १२ ते १ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे,साहेबराव राठोड,आणि शिवानंद बनगे यांनी घटनास्थळी धाव घेत रमेश अंगरख या तरुणाचा मृतदेह खाली उतरवत पुढील कारवाईसाठी बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे यांनी रमेश यास तपासुन मृत घोषित केले.व शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यादरम्यान मयत रमेश बबन अंगरख हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी पोलिसांना दिली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे व बीट जमादार दिलीप साळवे करीत आहेत.