तलवारी सोबतचे फोटो स्टेट्सला ठेवणे तरुणाच्या आज येथील २० वर्षीय तरुणास पैठण एमआयडीसी पोलिसांनी केले अटक

तलवारी सोबतचे फोटो स्टेट्सला ठेवणे तरुणाच्या आज येथील २० वर्षीय तरुणास पैठण एमआयडीसी  पोलिसांनी केले अटक


./ पैठणी/ प्रतिनिधि/हारुन शेख/


पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील अशपाक महेबुब शेख या २० वर्षीय युवकास नवरात्र उत्सवाच्या व सणासुदीच्या काळात तलवार हातात घेऊन सोशल माध्यमाचा वापर करून ते फोटो स्टेट्सला ठेवणे चांगलेच महागात पडले आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्यावर बेकायदेशीर व विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या विषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यांतील ढोरकिन येथील युवक अशफाक महेबुब शेख याने आपल्या फोनच्या स्टेट्सला भली मोठी धारदार तलवार हातात घेतलेले फोटो दहशत पसरविण्याचा इराद्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत आहे.त्यामुळे त्याच्या संपर्कातील मित्र मंडळी तसेच ढोरकीन गावच्या नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचे व दहशतीचे वातावरण पसरले असल्याची माहिती एमआय डीसी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार कृष्णा उगले यांना मिळाली.अंमलदार उगले यांनी तात्काळ ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी सपोनी ईश्वर जगदाळे यांच्या कानावर घालत त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संभाजी झिंझुर्डे, ढोरकिन बीट जमादार दिनेश दाभाडे, कृष्णा उगले, राजेश सोनवणे,पंडित यांच्या पथकाने अशफाक शेख यास ताब्यात घेत त्याच्या जवळील तब्बल अडीच फूट लांब पाते असलेली धारदार तलवार हस्तगत केली.अशफाक याच्यावर विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र  बाळगल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की,कोणीही तलवार,चाकु तसेच ईतर धारदार शस्त्राने वाढदिवसाचे केक कापून सोशल माध्यमावर प्रसारीत करु नये तसेच विनापरवाना व बेकायदेशीर घातक शस्त्र हाती घेवुण ज्यामुळे नागरीकांमध्ये घबराटीचे व दहशतीचे वातावरण पसरेल असे फोटो काढून स्टेट्सला किंवा सोशल माध्यमावर टाकल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new