जय जवान जय किसान भराडी ता. सिल्लोड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताला

जय जवान जय किसान भराडी ता. सिल्लोड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताला हरितक्रांतीकडे घेऊन जाणारे भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्त साधून  मिरची प्रक्रिया शीतगृह प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. शेख़ नईम, सिल्लोड प्रतिनिधि,यानंतर



 

तसेच आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात हजारो शेतकरी बांधवांशी संवाद साधला. सिल्लोड परिसरात अनेक शेतकरी मिरची, टोमॅटो, अद्रक यासाह इतर पालेभाज्यांचे उत्पादन घेतात. मात्र उत्पादन अधिक आल्यास भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांना आपला माल शीतगृहात ठेऊन जेव्हा भाव येईल तेंव्हा विकता येईल. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार आहे अशी माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

तसेच योग्य प्रक्रिया द्वारे मिरची मसाला व्यतिरिक्त, मिरची पावडर, मिरचीचे लोणचे,सॉस अशा असंख्य मूल्यवर्तीत उत्पादनांची निर्मिती होणार आहे.  शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाच्या तसेच उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीही प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new