पिंपळनेर महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा
पिंपळनेर,दि.15(अंबादास बेनुस्कर)येथील कर्म. आ.मा.पाटील कला,वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आयक्युएसी विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईल मॅन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्युएसी समन्वयक डॉ. संजय खोडके यांनी केले. याप्रसंगी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.डॉ.बी. सी.मोरे,डॉ.वाय.एम.नांद्रे, प्रा.एम.व्ही.बळसाने,डॉ.एन.बी.सोनवणे,डॉ.ए.जी. खरात,प्रा.डॉ.एस.एस.मस्के, डॉ.एस.एन.तोरवणे, डॉ.के.एन.वसावे,मिलिंद कोठावदे हे उपस्थित होते.