मुस्लिम समाजाचे निवेदन
साह संपादक सलीम कुरैशी
अजिंठा, (वा.) उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथील महंत यती नरसिंहानंद यांनी प्रेषित मोहमद पैगंबर (सअ.स) यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम सजाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर महंतांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अजिंठा येथील मुस्लिम समाजाने केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी उपविभागीय
पोलीस अधिकारी सिल्लोड यांना निवेदन देण्यात आले. सपोनि अमोल ढाकणे यांनी हे निवेदन स्विकारले. यती नरसिंहांनंद विरुद्ध कडक करवाई करून अटक न केल्यास लोकशाही मार्गाने शांततेत अजिंठा बस स्टैंड चौफुलीवर मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.