पोलीस अधीक्षक विशेष पथकाच्या अंभई येथे धाडी
साह संपादक सलीम कुरैशी
अजिंठा : ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि.४) दुपारी अंभई येथे अवैध धंद्यावर धाडी टाकल्या.छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या विशेष पथकातील पोलीस उपअधीक्षक भारती पवार, सपोनी भरत मोरे, पोहेकों संदीप अव्हाडे, जावेद शेख, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर आदींच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अंभई येथे चक्री जुगार अड्डूयावर धाड टाकली. या कारवाईत भीकन शेख याकुब कुरेशी, शागिर शब्बीर सय्यद (दोघेह रा.अंभई आणि
पंडित धोंडीबा तायडे (रा. सिरसाळा) तिघांना रंगेहाथ पकडले तर एक आरोपी फरार झाला. या आरोपीच्या ताब्यातून एलएएडी, सीपीओ, मोबाईल आदी ८८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई हॉटेल दोस्तानाच्या पाठीमागे मकाच्या शेतात तिर्रट खेळणाऱ्यांवर करण्यात आली. यात कमलाकर ढगे, संतोष शेळके (रा.रेलगाव), पांडू (रा.सिरसाळ तांडा) यांना पकडण्यात आले तर चार जुगारी फरार झाले. पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांच्या ताब्यातून तीन मोटारसायकली, मोबाईल आदी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.