विहिरीत बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

विहिरीत बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू




पिंपळनेर,दि.17(अंबादास बेनुस्कर)

साक्री तालुक्यातील रोजगाव शिवारातील एका शेतात शेळ्यांना चारा-पाण्याची सोय करीत असतांना मोहसीन शेख याचा दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाय घसरला व तो विहीरीत पडला. नातेवाईकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यास उपचारासाठी जैताणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.आज सकाळी त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात

आले.मोहसीनच्या मृत्यूमुळे जैताणेसंह पंचक्रोषीतून हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक वृत्त असे की,मोहसीन शेख हा त्याच्या शेतात नेहमीप्रमाणे शेळ्यांना चारा-पाणी देण्यासाठी काल दुपारच्या सुमारास गेला. विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेला असता पाय घसरल्याने तो विहिरीत पडला.दरम्यान,दुपारची वेळ असल्याने त्याच्या भावाने मोबाईलवर संपर्क साधला. मात्र मोबाईल स्वीचऑफ येत असल्याने तो शेतावर गेला.मोहसीन शेतावर दिसला नाही मात्र त्याची चप्पल विहिरीजवळ आढळून आली.त्यामुळे मोहसीन हा विहिरीत पडल्याचा संशय आल्याने लागलीच नातेवाईकांसह पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत मोहसीनचा शोध घेतला असता मोहसीन विहिरीत आढळून आला. त्यास बाहेर काढून जैताणे ग्रामीण रूग्णालय येथे हलविण्यात आले.मात्र या ठिकाणी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मोहसीनला तपासून मृत घोषीत केले. दरम्यान,नातेवाईकांनी मोहसीनचा मृतदेह बघून घटनास्थळी रोष व्यक्त केला तसेच बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.मोहसीनच्या पश्चात तीन मुले,तीन भाऊ असा परिवार आहे.याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ मालचे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new