सर्वाधिक उत्पन्नात साक्री आगाराचा राज्यात प्रथम क्रमांक
पिंपळनेर,दि.7(अंबादास बेनुस्कर)
साक्री आगाराने ऑगस्ट महिन्यात उत्पन्न वाढीच्या बाबतीत पुन्हा उच्चांक गाठला व राज्यात 93 गुण संपन्न करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.याअगोदर देखील माहे एप्रिल महिन्यात साक्री आगाराने 85 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता.
साक्री आगारात 87 बसेस असून ऑगस्ट महिन्यात एका वाहनाने सरासरी 342 किलोमीटर केले आहे. महत्वाचे म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये अपघाताचे प्रमाण निरंक असुन चालक,वाहक,यांत्रिक कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने चांगली कामगिरी बजावून साक्री आगाराचे नावलौकिक केल्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांचे कौतुक करीत अभिनंदन केले. दरम्यान साक्री आगारात आज प्रवाशी राजा व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक यांच्या दालनात कामगारांच्या समस्या अडिअडचणी जाणुन घेण्यासाठी विभाग नियंत्रक विजय गीते,विभागीय वाहतूक अधिक्षक वासुदेव देवराज,विभागीय सांख्यिकी अधिकारी सुरज माळी, आगार व्यवस्थापक सुनील महाले यांच्या उपस्थितीत कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांच्या अडिअडचणी बाबत बैठक झाली.यावेळी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स इटंकचे राज्यसघंटक सचिव दिनेश नेरकर,आगार इटंकचे सचीव संदिप पवार,आगार इटंकचे उपाध्यक्ष अरुण बच्छाव, सोशल मिडिया इटंकचे संदिप खैरनार,हिंमत सोनवणे,योगेश खैरनार,अमोल देवरे आदि कामगार व इतर संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.यावेळी कार्यशाळा अधिक्षक योगेश शिगांणे,सहाय्यक वाहतुक निरिक्षक पी.के.आहिरे यांच्या उपस्थीत कामगार दिनानिमित्त झालेल्या बैठकीत साक्री आगाराचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल कामगारांचे वरिष्ठांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच कामगांराच्या वतीने साक्री आगारात नवीन 15 बसेस उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी करण्यात यावेळी करण्यात आली.यावर विभाग नियंत्रक विजय गीते यांनी पुढील आठवड्यात प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज अशा दहा बसेस उपलब्ध करून देण्याचे अश्वासित केले व लवकरात लवकर अजून 5 बसेस उपलब्ध करु.तसेच कामगारांचे थकित वैद्यकिय बिलाचा देखील विषय घेण्यात आला.थकित वैद्यकिय बीले देखील दिपावलीपर्यंत कामगारांना मिळतील असे सांगितले.चालकाच्या कॅबीनमधील चालक बैठकिचे सीट देखील सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले.