परतीच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, खासदार डॉ. शोभा बच्छाव धीर देण्यासाठी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर..

परतीच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, खासदार डॉ. शोभा बच्छाव धीर देण्यासाठी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर



धुळे.२४(गोकुळ देवरे)धुळे व नाशिक जिल्ह्यातील सटाणा, बागलाण,मालेगाव ग्रामीण सह अनेक भागात परतीच्या पावसामुळे शेती पिके उध्वस्त झाली आहेत.मका पावसाळी कांदा,टमाटे,सोयाबीन या पिकांसह फळबागांचे देखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत संबंधितांना धीर दिला आहे. प्रशासनाने वेगवानपणे पंचनामे करीत नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी डॉ. शोभा बच्छाव यांनी प्रशासनाकडे केली आहे.परतीच्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे धुळे लोकसभा क्षेत्रातील सटाणा,बागलाण, मालेगाव ग्रामीण सह धुळे ग्रामीण,शिंदखेडा परिसरातील अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाळी कांदा,मका, टमाटे,सोयाबीन यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे हिरावला गेल्याने कोलमडलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.बागलान परिसरातील निकवेल,कंदाने,ठेंगोडा,मुजवाड,जुने निरपुर,नवे निरपूर,वाघम्बा किरमले पाडा,नवेगाव,तिळवण,माळीवाडा,साल्हेर,आलियाबाद व लगतच्या गाव शिवारांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली.शेती पिकांचे नुकसान पाहून त्यांचे देखील मन हेलावून गेले.प्रशासनाने वेगवानपणे नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करीत संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच नुकसानग्रस्तांना पिक विम्याचा तात्काळ लाभ मिळावा.अज्ञानपण व विजेचा अभाव आणि नेट अभावी पिक विमा फॉर्म न भरू शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new