गांधी जयंती निमित्त निजामपूर पोलीस स्टेशनला कार्यक्रम;गुन्हेगारी सोडून चांगले कामाला सुरवात करा व परिवर्तन घडून घ्या-सपोनि भामरे
पिंपळनेर,दि.2(अंबादास बेनुस्कर)
2 ऑक्टोंबर रोजी महापुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निजामपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास निजामपूर - जैताने येथील गावातील व परिसरातील नागरिक आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी निजामपूर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगतव्यक्त केले.यावेळी सपोनि मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनच्या आवारात व मुद्देमाल विभागात साफसफाई व स्वच्छता करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी सपोनी मयूर भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गुन्हेगारीने कमवून आणलेला अवैध पैसा हा क्षणिक सुख देतो व कष्टाने कमावलेला पैसा हा सुख-समृद्धी घेऊन येतो म्हणून तरुणांनी गुन्हेगारीला बळी पडू नये व आपले आयुष्य पोलीस स्टेशन,कोर्टात घालवू नये असे सांगितले. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात हिंसा सोडून अहिंसाचा मार्गावर चालून सत्याग्रह करून ब्रिटिशांच्या राज्य तत्वावर सत्य व अहिंसा या मार्गाने देशात आपली क्रांती घडवून आणली.यावेळी कार्यक्रमांसाठी परवेज सय्यद,अकबर पिंजारी,हेमंत महाले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.स.इ.सोनवणे,पोसइ भामरे,हेको.माळचे,हेको मोरे,पोको चव्हाण,पोको सुनील अहिरे,पोको दीपक महाले,पोको राकेश महाले,पोको दुरगुडे,पोको नागेश,पोको पावरा,पोको व पोलीस मित्र अनिस पठाण व त्यांचे सहकारी मित्र साहिल,जुनेद तांबोळी,इसाक मिर्जा,गोकुळ ईशी,अजय डबरू यांनी खास परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार रघुवीर खारकर यांनी मानले.