गोदावरी पात्रात मृत्य देह आढळल्या एकच खळबळ उडाली
* पैठण प्रतिनिधी हारून, शेख,
पैठण एमआयडीसी परिसरातील संत एकनाथ साखर कारखाना समोरील हॉटेल व्यावसायिक राजु माणिक शिंदे
वय ४८ रा.पेपर मिल ईसरवाडी यांचा मृत्यदेह शनिवार रोजी गोदावरी नदीत तरंगत्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यांत खळबळ माजली असुन आहे.सदर हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे की यात काही काळेबेरे आहे की अजुन काही या दृष्टीने पैठण पोलिस तपास करीत आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी की, पैठण येथील शासकीय रुग्णालय (घाटी) समोरील पैठणी साडी सेंटरच्या मागील बाजूस असलेल्या गोदा पात्रातील पाण्यात काही नागरिकांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला त्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली असता पैठण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, फौजदार सुधीर ओव्हाळ, कल्याण ढाकणे,जमादार नरेंद्र अंधारे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व पोलीसांनी शहरातील पोहणाऱ्या नागरीकांची मदत घेवून मृतदेह बाहेर काढत पैठण येथील शासकीय रुग्णालय घाटीत नेण्यात आला. त्यानंतर पैठण पोलिसांनी शहरातुन व तालुक्यामधील कोणी बेपत्ता झाले आहे काय याची माहिती घेतली असता पेपर मील,इसारवाडी येथील एक हॉटेल व्यावसायिक राजू माणिक शिंदे हे मागील तिन चार दिवसापासून बेपत्ता आहेत व त्यांची पत्नी व मुलगा हे शोध घेत आहेत व त्यांचा अजुन शोध लागलेला नाही
अशी माहिती मिळाल्यानंतर पैठणचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी राजु शिंदे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलावत मृतदेह दाखविला असता त्यांनी सदरील मृत्य देह हा बेपत्ता असलेले हॉटेल व्यावसायिक राजू माणिक शिंदे यांचाच असल्याचे सांगितल्याने पैठण पोलीस ठाण्यात याची आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार एस. आर चेडे हे करीत आहे. या दरम्यान सदरील हॉटेल व्यावसायिक राजु शिंदे यांनी आत्महत्या केली आहे की यात काही काळेबेरे आहे हे आता पैठण पोलिस तपासा अंतीच स्पष्ट होणार आहे.चौकट या हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या ? की काही काळेबेरे या दृष्टीने पैठण पोलिसांचा तपास सुरू.