महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन राज्य समितीची कासारे शाखेला भेट व मार्गदर्शन
पिंपळनेर,दि.4(अंबादास बेनुस्कर)
साक्री तालुक्यातील कासारे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितिच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता अनिस शाखा कासारे गावाला भेट दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासारे शाखेचे अध्यक्ष सुरेश पारख होते.2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती तसेच मातोश्री स्वर्गीय चंदनबाई पारख यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते पुजन व कासारे शाखेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस साथी विनायक सावळे व राज्यकार्यवाह सोशल मीडिया विभागाचे साथी किर्तीवर्धन तायडे यांनी कासारे शाखेतील पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.सभासद संख्या वाढविणे व दरमहा शाखेतील बैठकीचे आयोजन करणे व वेगवेगळ्या उपक्रमातून अंधश्रद्धा दूर करणे,श्रद्धा व अंधश्रद्धा यात काय फरक असतो याविषयी मार्गदर्शन केले.कासारे येथील सामाजिक कार्यकर्ते व अनिसचे पदाधिकारी अनिल देसले यांना लातूर येथील अधिवेशनात शहीद चंद्रशेखर आजाद राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचा आणि कासारे शाखेच्या कार्याध्यक्षा श्रीमती रत्नमाला देवरे सोनवणे यांना रोटरी क्लब धुळे यांच्या मार्फत राष्ट्र निर्माते(नेशन बिल्डर ) पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे व सोशल मिडीया राज्य विभाग कार्यवाह किर्तिवर्धन तायडे शाखा अध्यक्ष सुरेश पारख माजी धुळे जिल्हा महिला कार्यवाह मंगला पारख,उपाध्यक्ष विलास देसले,सुहास सोनवणे,प्रधान सचिव विनोद सोनवणे,सह सचिव सुवर्णा देसले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पारख यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये शाखेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली व शाखा चांगले कार्य करीत आहे असेही नमूद केले.प्रस्ताविक अध्यक्ष सुरेश पारख यांनी केले.उपाध्यक्ष सुहास सोनवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस विनायक सावळे व सोशल मिडीया कार्यवाह किर्तीवर्धन तायडे यांचा कासारे शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिस कासारे शाखा अध्यक्ष सुरेश पारख कार्याध्यक्षा रत्नमाला सोनवणे,प्रधान सचिन विनोद सोनवणे,उपाध्यक्ष विलास देसले,सुहास सोनवणे,सहसचिव सुवर्णा देसले अनिसच्या जिल्हा कार्यवाह मंगलाताई पारख,प्रज्ञा विनोद सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अनिल लोटन देसले,योगेंद्र बोरसे,सुरेश गवळे,लखन बागुल,मनोहर भामरे मुकुल देसले,अविनाश चव्हाण भाऊसाहेब.डाॅ हिरालाल पारख,सुभाष निकवाडे.मोहन देसले,महिला कार्यकर्त्या आरती बागुल,आशाबाई चौधरी, दिपाली चौधरी,निकीता चौधरी,मीराबाई चौधरी, मंगला चौधरी,हर्षदा चौधरी, ज्योती चव्हाण आदी महिला व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपाध्यक्ष विलास देसले यांनी केले तर आभार प्रधान सचिव विनोद सोनवणे यांनी केले.