पारोळा येथील आंबेडकरी वस्तीवर हल्ला करणाऱ्या जातीयवादी तरुणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अन्यथा भव्य मोर्चा आणू
..
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे 3 ऑक्टोबर रोजी रात्री किरकोळ वादामुळे जातीय गावगुंडांनी मोठा जमाव जमवून दलित वस्तीमध्ये घुसून दगडफेक केली. यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. पोलिसांसमोर ही जबर दगडफेक करण्यात आली. मात्र हल्लेखोरांना न पांगविता पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. त्यात काही पोलीसही जखमी झाले. नंतर पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन राबवित दलित वस्तीतील निराधार मुलांना घरातून बाहेर काढत मारहाण करीत नेले. दुसऱ्या गटातील लोकांना देखील पोलीस घेवून गेले. दोन्हीकडील लोकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु ही दंगल घडवणारे बजरंग दलचे ज्यांनी घडविली ते मुख्य बजरंग दलाचे लोकांना अटक करण्यात आली नाही. या घटनेमुळे पारोळा येथील दलित वस्तीत भीतीचे वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, मुकेश अण्णा खरात, आबा अमृतसागर, आप्पा, रोहित सोनवणे विकी लोंढे आणि काही आंबेडकरी युवकांसोबत पारोळा गाठून हल्लाग्रस्त दलित वस्तीला भेट दिली. घटना पूर्णपणे जाणून घेत दलित कुटुंबांना धीर देत गावकऱ्यांना सोबत घेत पोलीस स्टेशन पर्यंत पायी शांततेने मोर्चा काढला. पोलीस प्रशासनाला घटनेला आटोक्यात का आणले नाही याबाबत जाब विचारला. सोमवार दिनांक 7 ऑक्टोबरपर्यंत अट्रोसिटी ॲक्ट नुसार हल्लेखोर आणि त्यांना चिथावणी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सोमवार नंतर गर्दी मावणार नाही एवढा मोठा मोर्चा उत्तर महाराष्ट्रातून पारोळ्यात येईल त्याला जबाबदार पोलीस प्रशासन जाईल असा इशारा देण्यात आला...यावळेली पारोळा येथील आंबेडकरी वस्तीतील सर्व माता-भगिनी,तरुण वयोवृध्द उपास्थित होते.पारोळा येथील आंबेडकरी वस्ती ही संख्येने जरी कमी असेल पण त्यांनी स्वतः कमजोर समजू नये..महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी समाज तुमच्या सोबत आहे हे आम्ही विश्वासाने सांगतो.जयभीम!