सपोनि भामरेच्या कारवाईचा धडाका सुरूच*गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत*

सपोनि भामरेच्या कारवाईचा धडाका सुरूच*गावठी हाथ भट्टीवर छापा लाखोचा मुद्देमाल हस्तगत*



निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळताना अड्यावर निजामपुर पोलीस पथकाचा छापा गावठी हातभट्टीची दारु, मोटार सायकल सह एकुण-४, ४२,७००/- रुपये मुद्देमाल जप्त करुन अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना व गावठी हातभट्टीची दारु गाळणा-यांवर धडक कारवाई दिनांक २६/१०/२०२४ रोजी मा. प्रभारी अधिकारी श्री. मयुर भामरे सो सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपुर पोलीस स्टेशन. यांना गुप्त बातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीत वेहेरगाव फाट्या जवळ तसेच छडवेल कोर्डे, व टिटाणे गाव शिवारात अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु गाळत आह व वाहतुक करीत आहे. त्यावरुन सपोनी मयुर भामरे यांनी पोलीस पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. लागलीच सदर पथकाने-१) वेहेरगाव ता.साक्रीशिवारात छापा टाकुन आरोपी नामे सुरेश बन्सीलाल सोनवणे याच्या ताब्यात एकुण-१,२७,५००/-

अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन. ३१० / २०२४ महा.दारु बंदी

अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.२) छडवेल कोर्डे ता.साक्री गाव शिवारात आरोपी नामे परशुराम भाईदास कोतवाल हा त्याची मोटार सायकल क्र. एम.एच.१८ ए.एफ.८०६८ हिचेवर अवैद्यरित्या गावठी हातभट्टीची दारु वाहतुक करताना त्याचेवर छापा टाकुन त्याच्या ताब्यात एकुण-१,५०,२००/- अश्या मो.सा.सह मुद्देमाल मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन.३११/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(अ), (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.३) टिटाणे ता.साक्री शिवारात छापा टाकुन आरोपी नामे राजेंद्र गेंदा ठाकरे याच्या ताब्यात एकुण १,६५,०००/- अश्या मुद्देमाल सह मिळुन आल्याने त्याच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गुरन.३१२/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशा एकुण- ४,४२,७००/- रुपयेचा मुद्देमाल याबाबत निजामपुर पोलीस स्टेशन १) गुरन. ३१०/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५ (ई) वैगरे प्रमाणे, २) गुरन. ३११/२०२४ महा. दारुबंदी अधि.क.६५(अ),(ई) वैगरे प्रमाणे, ३) गुरन. ३१२/२०२४ महा.दारुबंदी अधि.क.६५(ई) वैगरे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग, साक्री श्री. एस. आर. बांबळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मयुर भामरे, पोउनी प्रदीप सोनवणे, पोउपनी/ यशवंत भामरे, पोउपनी / मधुकर माळचे,पोहेकॉ/४१० मोरे, पोहेकॉ / १३६१ आखाडे, पोना/१९९ पवार, पोकॉ/१५७९ सोमासे, असई/शेख, पोहेकॉ / १२५४ अहिरे,पोकॉ/५६२ दुरगुडे,पोकॉ/१२५३ शिंदे, पोकॉ/४५९ पावरा,पोकॉ/५०८ भिल, पोकॉ/११८८ पदमर,पोकॉ/१६८३ थाटशिंगारे

यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new