तरुणाच्या "मृत्युला" कारणीभूत ठरलेले "ते" वाहण पैठण एमआयडीसी पोलिसांना सापडेना


तरुणाच्या "मृत्युला" कारणीभूत ठरलेले "ते" वाहण पैठण एमआयडीसी पोलिसांना सापडेना* पैठण प्रतिनिधि/हारून/शेख/

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी (पि) येथील हमाली काम करणारा एक २९ वर्षीय तरूण हा एमआयडीसी परिसरातील पैठण ते औरंगाबाद संभाजीनगर महामार्गावरून दी.(८ ) मंगळवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराकडे पायी चालला असताना त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. व धडक देणारे वाहन घटना स्थळा वरून फरार झाले होते.परंतु या घटनेला आज पाच ते सहा दिवस उलटुन गेलेले आहे.तरी या घटनेतील" त्या" वाहनाचा तपास लावण्यात अद्यापही एमआयडीसी पोलिसाना यश आलेले दिसत नाही.

या बाबत माहिती आशी की,पिंपळवाडी पिराची येथील २९ वर्षीय अस्लम कडू शेख हा हमाली व मिळेल ते काम काम करणारा तरुण दी. ( ८ ) मंगळवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपले दिवसभराचे काम आटपून 

पैठण ते छ्त्रपती संभाजी नगर रोडवरील अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यांवरुन पिंपळवाडी पिराची येथील आपल्या घराकडे पायी घरी चालला होता.

त्याच वेळी त्याच्या पाठी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यास जोराची धडक दिली. सदरील वाहनांची धडक ही इतकी जबरदस्त होती की या धडकेत पायी चालणाऱ्या बिचाऱ्या अस्लम शेख याचा जागीच मृत्यू झाला.आजूबाजूच्या नागरिकांना घटना स्थळाजवळ पोहचेपर्यंत अपघात करणाऱ्या वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला होता.त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी अस्लम शेख यास पैठण येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले होते.परंतु फार उशीर झालेला होता घाटीतील वैद्यकीय अधिकारी यांनी अस्लम शेख यास तपासून मृत घोषीत केले.अपघात करणाऱ्या त्या अज्ञात वाहना विरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.परंतु आज रोजी घटना घडुन चार ते पाच दिवस होऊन गेले आहे. परंतु या तरुणाच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या "त्या "अज्ञात वाहनांचा एमआयडीसी पोलिस कसुन शोध घेत आहेत परंतु आज रोजी तरी पोलिसाना  "ते" वाहन शोधण्यास यश आलेले दिसत नाही.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new