पोलीस ठाण्यात अभिनव उपक्रम ! परिवर्तन दिनानिमित्त हिस्ट्रीशिटर यांचे प्रबोधन व स्वच्छता मोहीम

पिंपळनेर पोलीस ठाण्यात अभिनव उपक्रम ! परिवर्तन दिनानिमित्त हिस्ट्रीशिटर यांचे प्रबोधन व स्वच्छता मोहीम 



पिंपळनेर,दि.3(अंबादास बेनुस्कर) येथील पोलिस ठाण्यात सपोनी किरण बर्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने गुन्हेगाराचे मन परिवर्तन दिन व पोलिस स्टेशन आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांची जन्म तिथिच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धुळे यांच्या संकल्पनेतून "परिवर्तन सोहळा" कार्यक्रम पिंपळनेर पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी एसडीपीओ संजय बांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.डी.पाटील,सपोनी किरण बर्गे उपस्थित होते.सदर कार्यक्रमात समुपदेशक एस.डि.पाटील म्हणाले गुन्हेगार किंवा नेहमी गुन्ह्यात नाव असलेले सराईत गुन्हेगार यांनी गुन्हेगारी सोडून समाजाच्या मूळ प्रवाहात सामील व्हावे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पोलीस ठाण्यात परिवर्तन दिवस साजरा करण्यात आला.यावेळी संबंधित पोलीस ठाण्यातील हिस्ट्रीशिटर यांचे प्रबोधन करण्यात आले.जेणेकरून त्यांच्यातील चांगला मनुष्य जागृत व्हावा.धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेनुसार पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात आला.भविष्यात पोलिस कारवाईत कुठे सुधारणा करण्याची गरज आहे का ते देखील तपासण्या येईल.परिवर्तनाची आवश्यकता पोलिसांना देखील असू शकते.यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला.यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समुपदेशक एस डी पाटील,एसडीपीओ संजय बांबळे,किरण बर्गे यांनी प्रबोधनात्मक भाषण दिले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन आभार सपोनी किरण बर्गे यांनी मानले.यावेळी बोलताना  एसडीपीओ संजय बांबळे यांनी सांगितले की, वाल्ह्याकोळी याने अनेक अपराध केले.पण त्याच्या गुन्ह्यात त्याचे परिवार सामील नव्हते.त्यांनी त्या पापाचे भागीदार होण्यास त्याला नकार दिला.त्यामुळे खडबडून जागे झालेल्या वाल्ह्या कोळीचे पुढे वाल्मिकी ऋषीत परिवर्तन झाले.त्यामुळे तुम्ही देखील एक चांगले नागरिक बनू शकता असे सकारात्मक विचारांचे महत्त्व विषद केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिस्ट्रीशिटर व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.विविध कार्यक्रमांचे आयोजन*

गांधी जयंतीनिमित्त काल पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरातील गवत,झुडपं नष्ट करण्यात आले.तसेच मुद्देमाल,जप्त वाहने नीट लावणे स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत स्वतःसपोनी किरण बर्गे यांनी सहभाग घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन संदिप पावरा यांनी केले तर आभार सपोनी किरण बर्गे यांनी मानले.

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new