सोयगाव : पिकविम्या संदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक घ्या ; जरंडीच्या शेतकऱ्यांची मागणी

सोयगाव : पिकविम्या संदर्भात तक्रार निवारण समितीची बैठक घ्या ; जरंडीच्या शेतकऱ्यांची मागणी


कंपनी विरुद्ध कारवाई करण्याची निवेदन

सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण

सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झालेला असतांना पीकविमा कंपनी ने बाधित शेतकऱ्यांना पीकविमा वितरणाची रक्कम कमी स्वरूपात दिली असल्याचा थेट कंपनी वर आरोप करत तातडीने तालुका तक्रार निवारण समितीची बैठक लावण्यात यावी व या गैरप्रकारांची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन गुरुवारी  तालुक्यातील जरंदी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांना दिले सोयगाव तालुक्यात खरिप हंगाम २०२३ मध्ये गंभीर दुष्काळ असूनही पीकविमा कंपनीने विम्याच्या रक्कम देण्यासाठी हात आखडता घेत हेक्टरी पाच ते सहा हजार रु याप्रमाणे पिकविम्या ची रक्कम शेतकऱ्यांना खात्यात वर्ग केली आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त या प्रमाणात पिकविम्याची रक्कम दिली. यामध्ये खूप व्हेरिअशन असून इ पिकपाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या ७२ तासांच्या केलेल्या तक्रारी फेटाळून लावत या शेतकऱ्यांना पिकविम्या पासून वंचीत ठेवले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तातडीने तालुका तालुका तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी व पूर्ण विमा खात्यात वर्ग करावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर दिलीप पाटील, रविंद्र पाटील,श्रीराम नारायण पाटील, श्रीराम तुकाराम पाटील, नरेंद्र पाटील,डॉ अविनाश पाटील,दिलीप महाजन, गोपाळ पाटील राजेंद्र पाटील प्रणव पाटील,विनोद सुरेश पाटील राजू पाटील आदींसह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new