पिंपळवाडी (पि) बिस्मिल्ला मस्जिद परिसरातील उघडी डी पी भविष्यात ठरू शकते जीवघेणी.महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतले डोळे असुन आंधळेपणाचे सोंग

पिंपळवाडी (पि) बिस्मिल्ला मस्जिद परिसरातील उघडी डी पी  भविष्यात ठरू शकते जीवघेणी.महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतले डोळे असुन आंधळेपणाचे सोंग 


पैठण, हारून शेख.

पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या बिस्मिल्ला मस्जिद परिसरात विद्युत पुरवठा करणारी डी पी महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी व भोंगळ कारभारामुळे मागील पाच ते सहा महिन्यांपासून झाकण तुटल्यामुळे उघड्या अवस्थेत आहे. यामुळे येथे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरील डी पी बिस्मिल्ला मस्जिद तसेच कुंभार गल्ली मधे राहणाऱ्या नागरीकांच्या येण्या जाण्याच्या मुख्य रस्त्यांवर 

मागील पाच ते सहा महिन्यांपासून सताड उघडी आहे. या रस्त्यावरून महावितरण कंपनीचे कर्मचारी या ना त्या कारणाने रोज येजा करतात परंतु या डी पी व्यवस्थित न करता तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत पुढे निघुन जातात. तसेच या डी पी  बॉक्स मध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने कधीही अचानक शॉट सर्किट होऊन या परिसरातील लाईट जाऊन बत्ती गुल होत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने येथील नागरीक त्रस्त झालेले आहे. भविष्यात या परिसरात महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपनामुळे मोठी दुर्घटना घडुन मोठी जिवीत हानी होण्याची क्षक्यता नाकारता ही येत नाही. तसेच येथील नागरिकांनी सदरील डी पी व्यवस्थित करून देण्यासंबंधी  अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडे विनंत्या,तक्रारी केल्या परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करत आले आहे. आता तरी महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वतःलक्ष घालत बिस्मिल्ला मस्जिद ते कुंभार गल्ली परिसरात वीज पुरवठा करणारी डि पी व्यवस्थीत व दुरुस्त करू देण्याची मागणी पिंपळवाडी पिराची येथील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

poads

new