पिंपळनेरची कुमारी रुपाली चौधरी राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित पिंपळनेर,दि.23(अंबादास बेनुस्कर)


पिंपळनेरची कुमारी रुपाली चौधरी राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

पिंपळनेर,दि.23(अंबादास बेनुस्कर)

पुणे येथे व्हि.एस.व्ही.एस एस सोशल फाउंडेशनच्या वतीने  राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यात धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर गावची भूमिकन्या,वक्तृत्वाची हिरकणी म्हणून ओळख असलेली कुमारी रुपाली कन्हैयालाल चौधरी हीचे सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.नुकताच तिला नाशिक येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.सध्या ती कायद्याचे शिक्षण घेत आहे.ह्या कार्यक्रमात पुरस्कार्थीचा प्रतिनिधी म्हणून सत्काराला उत्तर देताना आपल्या अभ्यासपूर्ण खुमासदार भाषाशैलीमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून प्रत्येकाने आपण समाजाचे देणे लागतो ही भावना जोपासावी.पुरस्कार प्रेरणा देतात.प्रेरणेने राष्ट्र निर्माण होते व पर्यायाने समाजाची व देशाची प्रगती होते असे मत व्यक्त केले.व मला याठिकाणी घडवण्यामागे माझे गुरुवर्य प्रा.डी.टी.पाटील व आई वडील यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.ह्याचे श्रेय माझ्या गुरुवर्याना देते असे तिने भाषणातून गुरुवर्यांचे व ज्यांनी सन्मानित केले त्या संस्थेचे ऋण व्यक्त केले.

अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार,विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, कोचळेवाडीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कोचळे सर यांनी सुयोग्यरित्या आयोजन केले होते.ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले तत्कालीन सहकारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर पुणे,तसेच भिडेवाडाकार विजय वडवेवार,आणि सिनेअभिनेते अशोक नलावडे व सिनेअभिनेत्री प्रियंका शिंदे उपस्थित होत्या.ह्या गौरवशाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new