साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा;शिंदे सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा;शिंदे सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन


पिंपळनेर,दि.15(अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यात परतीच्या ढगफुटी सदृश पावसाने सर्वच साक्री तालुक्याला झोडपून काढले आहे.यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने,प्रशासनाने साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे शिंदेसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील काटवान परिसर,माळमाथा परिसरात सोयाबीन,शिलानी मका, बाजरी,कापूस,यासह कांदयाचे बियाण्यांचा लाखो रुपये खर्च वाया गेला आहे. परिसरातील रस्ते वाहून गेले असून,शेतात पाणीच पाणी साचले आहे.येणाऱ्या हंगामाच्या पिकांची देखील शाश्वती नाही.दिवाळी सणाच्या दिवसांपर्यंत शेतकरी उभा राहू शकत नाही.माळमाथा परिसरात पेरेजपूर,सालटेक,खुडाणे, शडोमकानी,परिसरातील धरण फुटल्याने शेतात संपुर्ण पाणी झाले आणि पान् विहीरी वाहून गेल्या आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण साक्री तालुक्यात पंचनामा करुन त्वरीत नुकसान भरपाई व पिकविमा मंजूर करण्यात यावा.अशी मागणी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी धुळे जिल्हा संपर्क प्रमुख विशाल देसले,जितेंद्र देसले,बाळा देवरे,निवृत्ती हिरे,प्रवीण तोरवणे,विकास जाधव,भरत मराठे,भिका जाधव,सरपंच ललित पवार,उपसरपंच दीपक खैरनार,अमोल अहिरे,प्रांजल अहिरे,नरेंद्र खैरनार,बापू कुंवर,रविंद्र चव्हाण आदी शेतकरी व ग्रामस्थ,शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new