राज्य कृषी उत्पन्न मंडळ व राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित

बाजार समितीत लाक्षणिक संप


पिंपळनेर,दि.8(अंबादास बेनुस्कर)महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ व राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित


राज्यस्तरीय परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहिले;परंतु बाजार समिती प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे,अडीअडचणी जाणून न घेतात परिषदेच्या स्थळावरून निघून गेले. त्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ दि.7 सोमवारी सर्व राज्यात बाजार समिती सभापती,संचालक,सचिव यांनी निषेध करत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला.तसेच बाजार समिती शासनाच्या विविध निर्णयामुळे बाजार समितीचे कामकाजावर व आर्थिक परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांच्या विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या. त्या अनुषंगाने येथील बाजार समितीत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला.तसेच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आले.नायव तहसीलदार चंद्रकांत शिंपी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी बाजार समिती सभापती डॉ.बन्सीलाल बाविस्कर, उपसभापती भानुदास गांगुर्डे, संचालक लादूसिंग गिरासे, जिजाबाई साबळे,दिनकर बागूल,भूषण बच्छाव, अविनाश उगलमुगले,यशवंत बागूल,समीर देसले,संदीप बोरसे,साईनाथ अहिरे आदी उपस्थित होते.फ़ोटो ओळी-साक्री: पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होत नायब तहसीलदार शिंपी यांना निवेदन देताना डॉ.बन्सीलाल बाविस्कर,भानुदास गांगुर्डे, भूषण बच्छाव,संचालक, कर्मचारी.

छाया:अंबादास बेनुस्कर

Post a Comment

أحدث أقدم

poads

new