साक्रीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट लाभ द्या;शिवसेना शिंदे गटाचे विशाल देसले यांची साक्री प्रशासनाकडे मागणी
पिंपळनेर,दि.23(अंबादास बेनुस्कर) साक्री तालुक्यासह परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उत्पन्नाच्या काळात पिके वाया गेल्याने शेतकरी अधीक अडचणीत सापडले आहे. शासनाने तातडीने दखल घेत न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे विशाल देसले यांनी केली आहे.
परतीच्या पावसाने 8 दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.कापुस,सोयाबीन, मका,बाजसी कायांचे चीयाचे अक्षरक्षा वाहुन गेले आहेत. शासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेत.परंतु प्रशासनाचे कृषी महसूल विभागाच्या कर्मचारी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले नाही.काही मंडळ अधिकारी,तलाठी शेतकऱ्यांचे फोन घेत नाहीत,काटचान परिसस,माळमाथा परिसर,कान परिसर,पश्चिम भागात संपूर्ण तालुक्यात सारखी पर्शित्स्थती आहे. विमा कंपनीवाले नकार सुध्दा घेत नाही.तक्रार करुन लाभ मिळत नाही.जवळच्या जिल्यात कर्तव्यदक्ष पालकमंत्री दादा भुसे यांच्यांकडून पाठपुरावा झाला तर नाशिक जिल्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 विमा कंपनीकडून तच्चल 884 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली.
परंतू धुळे जिल्ह्याला शेतकऱ्यांना अद्याप दमडीचा लाभ झाला नाही.अनेक तक्रारी करून दखल घेतली जात नाही.प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना साक्री तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा सससकट पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत व पिकवीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावुन त्वरीत बैठक लावून सन 2023 पिकवीमा लाभ मिळवून द्यावा.शेतकऱ्यांचा पिकवीमा काढून त्याचा लाभ मिळाला नाही तर शासनावरचा विश्वास उरणार नाही.म्हणुन विमा कंपनीच्या सर्व जवाबदार अधिकाऱ्यांना बोलावुन त्यांना त्वरीत शेतकरी तक्रार घेण्याचे आदेश द्यावेत व 2023 पिकवीमा लाभ मिळवून द्याचा.अन्यथा आंदोलन
शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामा करून भरपाई द्यावी अन्यथा येत्या 25 ऑक्टोंबर साक्री तालुक्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन साक्री तहसिल कार्यालयात प्रचंड धडक मोर्चा काढण्यात येईल व जोपर्यंत पिकवीमा कंपनीकडून 2023 व 2024 चे शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जाम करण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडली तर यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. याची दखल घ्यावी असेही विशाल अनंतराव देसले यांनी सांगितले आहे.दरम्यान प्रशासनाने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.