अजिंठा पोलीसांची पानस, शिवना येथील अवैध धंद्यावर कारवाई


अजिंठा पोलीसांची पानस, शिवना येथील अवैध धंद्यावर कारवाई


साह संपादक सलीम कुरैशी


सिल्लोड तालुक्यातील पानस आणि शिवना येथे सुरु असलेल्या अवैध धंदयावर अजिंठा पोलिसांनी बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्यांसह जुगार अड्यावर कारवाई केली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पानस वा गावात दोन ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जळगांव महामार्गावरील पानस फ्फ्राटा येथे आरोपी विजय छगनलाल जैस्वाल (५५) रा. खंडाळा ता. सिल्लोड याच्या ताब्यातून १ हजार ४४० रुपये किंमतीच्या १६ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच आरोपी लक्ष्मण राजाराम भोटकर (६५) रा. पानस ता. सिल्लोड याच्या ताब्यातून देशी दारुच्या ८ बाटल्या जप्त केल्या. त्याचप्रमाणे अजिंठा पोलिसांनी शिवना येथील बाजार पट्टा येथे दुपारी दिड वाजेच्या सुमारास जुगार अड्यावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी आरोपी नाना तोताराम केळोदे व अनिल बाबुराव काळे दोघे रा. शिवना ता. सिल्लोड यांना ताब्यात घेतले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी मटका जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण १९ हजार १९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलिस अंमलदार संदिप कोथलकर, भागवत शेळके, दिलीप तडवी, बबन जाधव, बामंदे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new