हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आश्विनी लाठकर मॅम यांचा सत्कार!

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आश्विनी लाठकर मॅम यांचा  सत्कार!


शेख नईम सिल्लोड प्रतिनिधि 

सत्कार कर्तुत्वान महीलाचा! छत्रपती संभाजीनगर-  आमच्या मार्गदर्शिका तसेच कर्तृत्ववान व्यक्तिमत्व श्रीमती आश्विनीजी लाटकर मॅडम यांची जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागात पदोन्नतीने नियुक्ती झाल्याने त्यांनी आज म्हणजे सोमवारी शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदाचा पदभार स्विकारल्याबद्दल शिक्षणाधिकारी कार्यालय, चेलीपुरा छत्रपती संभाजीनगर येथे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सरांनी फाउंडेशनच्या परंपरेनुसार पुस्तक, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्रीजी चव्हाण मॅडम, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती नीता श्रीमाळ मॅडम, वेतन अधिक्षक प्राथमिक श्री. भारत पालवे सर तसेच आमचे मोठे बंधू मार्गदर्शक मित्र प्रदिपभैय्या आदींची उपस्थिती होती...

Post a Comment

أحدث أقدم

poads

new